देशभरात सर्वत्र अनलॉक करण्यात आल्यानंतर चित्रपट व मालिकांच्या शूटिंगला सरकारकडून समंती देण्यात आली. सर्व खबरदारी व सुरक्षितता ठेवून शूटिंग सुरू करण्यात आले. मराठी मालिकांचे देखील शुटींग सुरळीत चालू असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली नवीन मालिका “आई माझी काळुबाई” या मालिकेच्या सेटवर तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही मालिका 14 सप्टेंबर पासून सोनी टेलिव्हिजन या वाहिनीवर सुरू झाली होती. परंतु मालिकेची शूटिंग 1 महिन्यापासून सुरू होती.
“आई माझी काळूबाई” मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल असून मालिकेची शूटिंग सातारा येथे चालू होती. या मालिकेतील “आशालता वाबगावकर” या ज्येष्ठ अभिनेत्रींचा देखील त्या 27 जणांमध्ये समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना साताऱ्याच्या दवाखान्यात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अलका कुबल या हॉस्पिटल मध्येच असल्याचे समजते.
मालिकेच्या शीर्षक गिताचे शुटींग करण्यासाठी मुंबई वरून काही डान्सर साताऱ्यात बोलवण्यात आले होते. त्यांच्या पासूनच संसर्ग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मालिकेत अलका कुबल, प्राजक्ता गायकवाड या प्रमुख भूमिकेत असून, विवेक सांगळे, संग्राम साळवी, शरद पोंक्षे हे कलाकार देखील आहेत. बाकी सर्वांची वेळीच तपासणी केल्याने सर्वजण आता ठीक असल्याचे अलका कुबल यांनी म्हटलं आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका