2020 या वर्षात सर्वांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेसोबतच कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांचे वेगवेगळ्या आजारामुळे निधन झाल्याच्या वार्ता समोर आल्या आहेत. आता एका लोकप्रिय सिंगरच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या गायिका अनुराधा पोडवाल यांच्या मुलाला काही दिवसांपासून किडणीचा त्रास होता. यामुळेच त्यांचा मुलगा आदित्य पोडवाल यांना दवाखान्यात काही दिवसांपासून उपचार चालू होते. आज सकाळी आदित्य यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
आई प्रमाणेच 35 वर्षीय आदित्य पौडवाल यांनी अनेक भजन गायली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी भक्ती गीतांवर जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले होते. त्यांचा आवाज देखील अनुराधा पौडवाल सारखाच सुरेख होता. त्यांचे नाव सगळ्यात कमी वयाचे संगीत दिग्दर्शक म्हणून “लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंदले आहे.
आदित्यच्या निधनावर अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले असून गायक शंकर महादेवन यांनी पोस्ट मध्ये शोक व्यक्त केला आहे. “मला विश्वास बसत नाही, एक उत्तम संगीतकार आणि प्रेमळ व्यक्ती आपल्यात राहिला नाही, 2 दिवसापूर्वीच त्याने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गायलो होतो. लव यू ब्रदर, मिस यू” असे पोस्ट करून शंकर महादेवन यांनी दुःख व्यक्त केलं.