सर्वत्र अनलॉक करण्यात आल्यानंतर सर्व मालिकांचे शूटिंग चालू असतानाच एक दुःखद बातमी समोर आली. “आई माझी काळूबाई” या नवीन मालिकेच्या सेटवरील तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळेच ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. यामुळे सर्वत्र शोककळा पसरली होती.
“आई माझी काळूबाई” या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी आशालता यांना आई समान मानले होते. त्यांनीच शेवटपर्यंत आशालता यांची काळजी घेतली होती. अलका कुबल यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये त्या खूप भावूक झालेल्या दिसून येत आहेत.
n
“नुकतेच ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवर 22 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ते सर्वच आता सुरक्षित आहेत. परंतु ज्येष्ठ अभिनेत्री ज्या मला आई समान होत्या, त्या आशालताजी यांचे निधन झाले. आम्ही त्यांना वाचविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु वय खूप असल्याने त्यांचे ऑक्सिजन लेव्हल खूप खालावले आणि त्या सोडून गेल्या,” असे अलका कुबल यांनी म्हटले.
पुढे बोलताना अलका जी म्हणाल्या, “4 दिवस मी आशालता जी सोबत असल्याने काहींना वाटले की मी देखील कोरोना पॉझिटिव आहे. मला तर किती जणांनी तर फेसबुकवर श्रद्धांजली देखील वाहिली. मी ठीक आहे. तुम्ही आम्हा कलाकारांवर प्रेम केलं आहे, ते कायम राहुद्या”.
पुढे त्यांनी “आई माझी काळूबाई” मालिकेचे सेट देखील पूर्ण तयार झाले आहे व सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे देखील त्यांनी म्हटले. “आमची मालिका पुन्हा जोमाने सुरू होत आहे. तुमचा पाठिंबा असू द्या,” असे भावनिक आव्हान अलका कुबल यांनी केले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.