काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे दुःखद निधन झाले. शूटिंग दरम्यान आशालता यांना कोरोनाचा संसर्ग झाला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. निधनावेळी त्यांचे वय 83 होते. त्या दवाखान्यात असताना अलका कुबल यांनी जे काही केले ते वाचून तुम्हालाही कौतुक वाटेल.

aai mazi kalubai news

 

“आई माझी काळूबाई” या मालिकेच्या शूटिंग दरम्यान सेटवरील 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यात आशालता यांचा देखील समावेश होता. परंतु वय जास्त असल्याने त्यांची तब्येत खूपच खालावली व त्यांना साताऱ्यातील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले. दवाखान्यात दाखल केल्यापासून मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल या पती समीर सोबत दवाखान्यातच थांबल्या होत्या.

Alka kubal news

आशालता सोबत अलका कुबल या सलग 5 दिवस सोबत होत्या. त्याबद्दल एका वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी सांगितले, “जेंव्हा डॉक्टरांनी मला आशालता या वाचू शकणार नाहीत असे सांगितले त्यावेळी मी लगेच डॉक्टरांना मला देखील पीपीई किट देण्याची मागणी केली. डॉक्टरांनी मला पीपीई किट दिली व मी आशालता ताई जवळ गेले.”

ashalata wabgaonkar


“आत गेल्यास मी त्यांना स्वतःच्या हाताने काही घास भरविले. त्यांची प्रकृती बिघडण्याच्या अगोदर देखील त्या आयसीयुमधून मला व समीर ना काय खावू वाटत असेल तर स्वतःच्या मुलांसारखे हक्काने मागत होत्या. आम्हीही त्यांना जे खावू वाटेल ते दूर दूर पर्यंत जाऊन आणून दिलं,” असे जड अंतकरणाने अलका कुबल यांनी सांगितले.

Alka kubal news


खरे तर आशालता आणि अलका कुबल या दोघी एकमेकांना जवळपास 35 वर्षांपासून ओळखतात. गेल्या 35 वर्षात आशालता यांना कसलाच आजार नसल्याचे देखील अलका कुबल यांनी सांगितले. माहेरची साडी चित्रपटात सावत्र माय लेकीची भूमिका साकारणाऱ्या या दोघी मात्र खऱ्या आयुष्यात सख्या माय – लेकी सारखेच जगल्या होत्या.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *