जगात असे अनेक फोटोग्राफर असतात जे आपल्या फोटो काढण्याच्या शैलीतून आकर्षक फोटो क्लिक करीत असतात. पण कधी कधी फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातून अचानक असे काही क्लिक होते ज्यातून त्याचे आयुष्यच बदलून जाते. असेच काहीतरी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका फोटोग्राफर बाबतीत घडले.


सियान नामक हा फोटोग्राफर सिडनी जवळील समुद्रात हवेतून मास्यांची फोटोग्राफी करीत होता. हे करीत असतानाच सियान ने कॅमेरात एका लांबलचक मास्याला टिपले. हा मासा साधारण नसून या माश्याचे नाव “ब्ल्यू व्हेल” आहे. हा माश्याचे वर्णन ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल. हा मासा इतका लांब आहे की त्याला एकाच फोटो मध्ये समाविणे कठीण असते. सियान ने या माशाचा व्हिडिओ देखील बनविला आहे.

“ब्ल्यू व्हेल” या माश्याची लांबी जवळपास 82 फूट असून त्याचे वजन 1 लाख किलोग्राम असल्याचे बोलले जात आहे. खरे म्हणजे गेल्या 100 वर्षात ही फक्त तिसरी वेळ आहे ज्यात एखाद्या फोटोग्राफर ने या माश्याला एकाच फोटो मध्ये कैद केले आहे. त्यामुळे सीयानचे यासाठी कौतुक करण्यात येत आहे.


सियान ने फोटो पोस्ट करताना लिहिले “माझ्या डोक्यात सध्या लाखो विचार चालू आहेत, हा मासा 30 मीटर लांबीचा असू शकतो व याची जीभ एखाद्या हत्ती सारखी असू शकते. तसेच या माशाचे हृदय एका गाडीच्या आकाराचे असू शकते. हा फोटो पाहून तुम्हालाही आनंद झाला असेलच, मला हा एक जॅकपॉट लागला आहे.”

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *