कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी आयपीएल उशीरा सुरू करण्यात आले. आयपीएल सुरू होणे आणि कोणता वाद झाला नाही तर नवलच. भारताचे लोकप्रिय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कॉमेन्ट्री करताना विराट कोहली व अनुष्का शर्मा बद्दल बोललेल्या एका वाक्यामुळे खूपच गोंधळ उडाला आहे. सोशल मीडयावर त्या व्यक्तव्याची चर्चा होत असतानाच अनुष्का शर्मा ने संताप व्यक्त केला आहे.
आरसीबी विरूद्ध किंग्ज 11 पंजाब मध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत होता. त्यावेळी सुनील गावसकर कॉमेन्ट्री करीत होते. फलंदाजी मधील विराट कुठे तरी चुकत आहे हे सांगताना त्यांनी म्हटले, “लॉकडाऊन मध्ये विराट ने फक्त अनुष्काच्या बॉलिंग वर प्रॅक्टिस केली आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहिले आहोत व त्याने काहीच होणार नाही.”
या वाक्याचा सोशल मीडियावर वेगळाच अर्थ काढण्यात अाला. त्यावर अनुष्का शर्मा देखील खूपच संतापली. “तुम्ही केलेले व्यक्तव्य खूप त्रासदायक आहे. नवऱ्याच्या खेळात तुम्ही बायकोला का मध्ये आणत आहात. इतके वर्ष तुम्ही दुसऱ्यांना जो आदर केलात तसाच आमचा करतात, असे वाटत नाही,” असे अनुष्काने सुनावले.
“माझ्या नवरा चांगला खेळत नसेल तर तुमच्या कडे टीका करण्यासाठी नक्कीच दुसरे शब्द असतील, पण मला त्यामध्ये घेणे गरजेचे आहे का? मला नेहमीच का क्रिकेट सोबत जोडले जात असते. मिस्टर गावसकर तुम्ही या खेळात महान आहात, तुम्ही बोललेले वाक्य ऐकून मला काय वाटले तेच बोलू दाखविले.”
यावर प्रतिक्रिया देताना गावसकर यांनी म्हटले, मी अनुष्काला विराटच्या खराब खेळी साठी दोषी ठरविले नाही. विराट ने फक्त अनुष्का सोबत टेनिस बॉल वर प्रॅक्टिस केली, इतकेच म्हटले. मी पत्नीचा आदर करतो व मी स्वतःच क्रिकेटर्स ना विदेशी दोऱ्यावर जाताना पत्नी सोबत घेऊन जाण्यासाठी लढत असतो.”
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका