देशभरात सर्वत्र अनलॉक करण्यात आल्यानंतर चित्रपट व मालिकांच्या शूटिंगला सरकारकडून समंती देण्यात आली. सर्व खबरदारी व सुरक्षितता ठेवून शूटिंग सुरू करण्यात आले. मराठी मालिकांचे देखील शुटींग सुरळीत चालू असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली नवीन मालिका “आई माझी काळुबाई” या मालिकेच्या सेटवर तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही मालिका 14 सप्टेंबर पासून सोनी टेलिव्हिजन या वाहिनीवर सुरू झाली होती. परंतु मालिकेची शूटिंग 1 महिन्यापासून सुरू होती.
“आई माझी काळूबाई” मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल असून मालिकेची शूटिंग सातारा येथे चालू होती. या मालिकेतील “आशालता वाबगावकर” या ज्येष्ठ अभिनेत्रींचा देखील त्या 27 जणांमध्ये समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना साताऱ्याच्या दवाखान्यात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते व तेथेच त्यांच्यावर उपचार चालू होते. आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रेमळ व्यक्तिमत्त्व व कसदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या.” अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच “बाळा” म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईच्या आत्म्याला शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏽🙏🏽” अशा शब्दात रेणुका शहाणे ने यांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांना Mardmarathi.com कडून भावपूर्ण श्रद्धांजली