गेल्या 13 वर्षापासून लोकप्रिय ठरत असलेला “बिग बॉस” या हिंदी शो चे 14वे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षी प्रमाणे शोच्या फॅन्स मध्ये उत्सुकता असते की येणाऱ्या सीझन मध्ये नेमके कोण कोण येणार. तसेच 13वे सीझन हीट झाल्याने सलमानच्या मानधनात देखील मोठी वाढ झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोंबर मध्ये सुरू होणाऱ्या बिग बॉस शो मध्ये राधे मा हिचा समावेश असण्याची शक्यता आहे. बिग बॉसचे मेकर्स चे राधे मा सोबत यासंदर्भात बोलणी चालू असल्याचे समजते. स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असे म्हणणाऱ्या राधे मा ही शो मध्ये आल्यास दरवर्षीप्रमाणे हा शो वादग्रस्त होण्याची शक्यता आहे.
तसेच खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारस छाबडाची एक्स गर्लफ्रेंड अकांक्षा पुरी, खतरो के खिलाडी शो ची विजेती निया शर्मा, जास्मिन भसीन, शांती प्रिया, अविनाश मुखर्जी, निखील चीनप्पा, सुगंधा मिश्रा, व्हिव्हियन डीसेना यांचा समावेश पूर्णतः नक्की असल्याचे समजते. तसेच, आणखीन काही सेलिब्रेटिज सोबत मेकर्स चर्चा करत असल्याचे समजते. फेमस युट्युबर कॅरी मिनाती यांनी मेकर च्या विनंतीला फेटाळून लावले आहे.
बिग बॉस चे तेरावे सीजन सुपरहिट झाल्याने यावर्षी बिग बॉसचे घर खूपच उत्कृष्ट दर्जाचे असणार आहे. तसेच या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान याच्या मानधनात वाढ केली आहे. या सीजन साठी सलमान खान तब्बल 450 करोड रुपये घेणार असल्याचे समजते. म्हणजेच 15 करोड एका एपिसोड्सचे व आठवड्यातून 2 दिवस त्याचे शूट असल्याने 30 करोड एका आठवड्याचे घेणार असल्याचे समजते. एकीकडे सलमान खानला या शोमधून बॉयकॉट करण्याची मागणी होत असताना सलमान ने घेतलेली हे रक्कम थक्क करणारी आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेअर करायला विसरू नका.