भारतातील अनेक विवाहित महिलांची स्वप्न चार भिंतीच्या आत अडकून राहतात. काही महिला सर्व अडचणीचा सामना करीत आपली स्वप्ने पूर्ण करीतच असतात. आज आम्ही ज्या महिलेबद्दल सांगणार आहोत, तिच्याबद्दल ऐकुन तुमच्या पण भूवया उंचावतील. या महिलेचे नाव आहे “किरण देंबला”.
किरण देंबला यांचा जन्म आग्रा येथे झाला. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी परिवारासोबत हैद्राबाद येथे राहू लागल्या. 2006 साली त्यांच्या मेंदूत एक गाठ असल्याचे निदान झाले होते. त्यांनी त्यावर 3 वर्षे उपचार घेतला. त्यात त्यांचे वजन खूप वाढले होते. आजारपण चालू असतानाच त्यांनी ठरविलं होत की आपलं स्वतःचं पण आयुष्य तयार करायचं.
किरण यांनी त्यांच्या जवळील एका जिम मध्ये जॉईन केली. त्यांनी स्वतःवर मेहनत घेऊन 7 महिन्यात तब्बल 24 किलो वजन कमी केले. नंतर त्या स्वतः जिम ट्रेनर बनल्या व सेलिब्रिटींना ट्रेनिंग देऊ लागल्या. त्यांनी नंतर स्वतःच्या बॉडीवर वर मेहनत घेऊन सिक्स पॅक अॅब्स बनविले. तसेच किरण ने सर्व बॉडी वर मेहनत घेऊन पिळदार शरीरयष्टी बनविली.
2 मुलांच्या आई असणाऱ्या किरण यांची आज लोकप्रिय फिटनेस ट्रेनर म्हणून ओळख झाली आहे. त्यांचे वय सध्या 45 असून त्यांच्या बॉडी पुढे अनेक पुरुष बिल्डर देखील फिक्के पडतील. त्यांनी भारतातर्फे बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला होता व त्यात सहावा क्रमांक देखील पटकावला होता.
सुशांतच्या मृत्यू दिवशी फक्त मितु दिदीच घरी होती. सुशांतचा मित्र संदीपने अखेर तोंड उघडले
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.