सरोगसी म्हणजे काय?
एखाद्या महिलेला आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून देखील मुल होत नसेल अशा वेळी दुसऱ्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेणे, म्हणजेच सरोगसी होय. कधी कधी काही जण स्वेच्छेने सरोगसीचा निर्णय घेत असतात.सरोगसी मध्ये आई-वडील होऊ इच्छिणाऱ्या जोडी पैकी पुरुषाचं स्पर्म हे बाळाला जन्म देणाऱ्या महिलेच्या बीज सोबत मॅच केलं जातं. या बदल्यात महिलेला भरपूर पैसा देण्यात येतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सरोगसी मार्फत बाळाला जन्म दिला आहे. जाणून घेऊयात कोणी कोणी हा पर्याय निवडला आहे.नुकतेच प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांनी सरोगसी द्वारे बाळाला जन्म दिला होता. परंतु, यापूर्वी अनेक कलाकारांनी सरोगसी द्वारे पालकत्व प्राप्त केले आहे.
1. सनी लियोनी – डॅनियल : भूतकाळाला विसरून नव्याने जीवन सुरू करणाऱ्या सनी लियोनी ने 2 जुळ्या बाळांना सरोगसी मार्फत जन्म दिला होता. तसेच सनी व डॅनियल यांनी निशा नामक एका लहान मुलीला दत्तक देखील घेतले आहे. त्यामुळेच दोघांचे कौतुक करण्यात येते.
2. अमीर खान – किरण राव : किरण ही अमीर खानची दुसरी पत्नी असून आझाद हा त्यांचा मुलगा आहे. आझादचा जन्म देखील सरोगसी प्रक्रियेतून झाला आहे. अमीरची पहिली पत्नी रीना दत्ता हिला इरा व जूनैद ही 2 मुलं आहेत. परंतु त्यांचा जन्म साधारण पद्धतीने झाला होता.
3. शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा : हे नाव वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. होय शिल्पा शेट्टीने देखील सरोगसी मार्फत एका मुलीला फेब्रुवारी 2020 मध्ये जन्म दिला आहे. त्या मुलीचे नाव समिषा ठेवण्यात आले. शिल्पा व पती राज कुंद्रा यांना यापूर्वी एक मुलगा असून त्याला स्वतः शिल्पाने गर्भवती राहून जन्म दिला होता.

4. शाहरुख खान – गौरी खान : या जोडीला आर्यन, सुहाना, अबराम अशी तीन मुले आहेत. अबराम हा सर्वात लहान असून त्याचा जन्म सरोगसी मार्फत झाला आहे. गौरीचे वय 40 च्या पुढे गेल्याने शाहरुख ने सरोगसी करण्याचा निर्णय घेतला होता. अबराम ने हॅप्पी न्यू इअर या चित्रपटातून बाल कलाकाराची भूमिका देखील साकारली आहे.

5. करण जोहर : सध्या लोकांच्या टीकेचा बिंदू ठरलेला निर्माता करण जोहर लग्न न करताच सरोगसी मार्फत रूही आणि यश यांचा बाप बनला आहे. दोघांचा जन्म 6 मार्च 2018 रोजी झाला होता. सध्या करणच्या चित्रपटांना बॉयकॉट करण्याची सर्वत्र मागणी केली जात आहे.
6. तुषार कपूर : हा एक अविवाहित असून 2016 त्याचा सरोगसी मार्फत एका मुलाला जन्म दिला होता. तुषार ने त्याचे नाव लक्ष्य ठेवले आहे.
7. एकता कपूर : भावा प्रमाणेच एकता कपूर हिने देखील जानेवारी 2019 मध्ये मुलाला जन्म दिला आहे. एकता ने वडील जितेंद्र यांचे खरे नाव रवी हे मुलाला दिले आहे.
माहिती कशी वाटली हे कमेंट करून कळवा व शेअर करायला विसरू नका.