जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. नंतर काही दिवसांनी तीच व्यक्ती जिवंत असल्याचे कळते. अशा घटना अनेक वेळा चित्रपटात पाहिलो आहोत. परंतु अशीच एक आश्चर्यकारक घटना खऱ्या जगात समोर आली आहे. ही घटना खूपच भयानक आहे.
बिहारच्या पटना जिल्ह्यातील वैशाली गावात काही दिवसापूर्वी तरुण मुलीच्या अपहरणाची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी त्या परिसरातील एका शेतात एका तरुण मुलीची बॉडी मृत अवस्थेत सापडली होती. त्या मुलीचा बलात्कार करून तीचा खून करण्यात आला होता व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून चेहऱ्यावर एसिड टाकण्यात आले होते.
अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आलेल्या त्या पालकांना बोलविले व त्यांनी हीच माझी मुलगी असल्याचे सांगितले. त्या मुलीचा पोस्टमार्टम केल्यानंतर तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला. परंतु जी स्वतःची मुलगी समजून घरच्यांनी अंत्यसंस्कार केले, मेनका नामक त्या मुलीने 10 दिवसानंतर जिवंत असल्याचे उघड झाले आहे. तीने स्वतःचा नवीन व्हिडिओ शेयर करून एकच खळबळ माजविली आहे.
मेनकाने व्हिडिओ मध्ये बोलताना सांगितले, “माझे व माझ्या प्रियकराचे प्रेम होते. आम्ही घरच्यांना या नात्याबद्दल सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला. म्हणून आम्ही स्वतःच्या मर्जीने घर सोडून पळून आलो. माझ्या आई वडिलांनी मी मेले असे खोटे बोलले. मी त्यांना त्याच दिवशी फोन करून विचारले असता त्यांनी आता असेच होवू दे म्हटले.”
या प्रकरणामुळे बिहार पोलिसांच्या कार्यवाही वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनी त्या पालकांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास पोलीस सुरुवातीपासून करीत आहेत. मुख्य प्रश्न हा आहे की ज्या मुलीला मृत समजून अंत्यसंस्कार करण्यात आले ती मुलगी नक्की कोण होती?
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..