सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास चालू असताना ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)ने अभिनेत्री रीया चक्रवर्ती व अन्य काहींना अटक केली. नंतर रियाने काही अन्य बॉलीवुड सेलिब्रिटीज ची नावे उघड केल्याने एकच खळबळ माजली होती. आता यामध्ये बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर आले आहे.
दीपिकाने ड्रग्स विक्रेत्याकडून ड्रग्स न मागविता तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश हिच्या मार्फत मग्विल्याचे उघड झाले आहे. या दोघीमधील व्हॉट्सअँप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. करिष्माला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले असून दीपिकाची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. दीपिका व करिश्मा या दोघीतील मेसेजेस असे होते.
दीपिका : के..माल आहे का?
करिश्मा : आहे माझ्याकडे पण घरी आहे. मी बांद्रा येथे आहे. जर तुला हवे असेल तर मी अमितला विचारू का?
दीपिका : येस प्लीज.
करिश्मा : अमित कडे आहे. तो येईल घेऊन.
दीपिका : हॅश(ड्र.गचा प्रकार) आहे ना? वीड नको
करिश्मा : तू कोको जवळ किती वाजता येशील?
दीपिका : 11.30/12. किती वाजता येईल तिथे?
करिश्मा : 11.30 वा. येईल तो. त्याला 12 वाजता दुसरीकडे जायचे आहे.
एनसीबी कडून या मेसेजेस ची लवकरच चौकशी केली जाऊ शकते. जर दीपिकाने अमली पदार्थाचे सेवन केले असेल तर तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. एकीकडे रीया चक्रवर्ती हिने सांगितलेल्या नावामध्ये श्रद्धा कपूर, सारा अली खान या अभिनेत्री अडचणीत सापडल्या असताना दुसरीकडे आता बॉलीवुड मधील आघाडीचे नावे देखील समोर येऊ लागली आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका