स्वतःचं मूल असणे हे प्रत्येक विवाहित जोडप्याचे स्वप्न असते. तसेच अनेकांना आपल्याला किमान मुलगा व एक मुलगी असायला हवी असे वाटत असते. परंतु कधी कधी नशिबात असे काही लिहिले जाते ज्याच्या पुढे आपण सर्वच हतबल होवून जातो.
मुली प्रत्येकानाच हव्या असतात. परंतु त्या बरोबरच वंशाचा दिवा हवा, असे आजही समाजात बोलले जाते. काहींना नशिबाने लगेच एक मुलगा व एक मुलगी प्राप्त होते. परंतु काहींना 2,3,4,5 मुलेच किंव्हा मुलीच होतात. अशा वेळी नशीब देखील थट्टा करताना दिसत असतो.
मध्यप्रदेश येथील मुरैना जिल्ह्यात तर एक अशी घटना घडली आहे, जी ऐकुन कोणीही दंग होवून जाईल. राम पहाडी गावात राहणारी 25 वर्षीय सपना हिला यापूर्वी 3 मुली होत्या. चौथा तरी मुलगा होईल या हव्यास्यापोटी तिने चौथ्या वेळी गरोदर राहण्याचे ठरविले. परंतु यावेळेस त्यांनी 1 किंव्हा 2 नव्हे तर चक्क 4 एकाच वेळी मुलींना जन्म दिला.
मुलाचे स्वप्न घेऊन दवाखान्यात दाखल झालेल्या सपना यांनी 4 मुलीला जन्म दिला हे ऐकुन सर्वांच्या भुवया उंचावल्या. अगोदरच 3 मुली होत्या आणि आता 4 झाल्या आहेत. चारही मुलींचे वजन प्रत्येकी केवळ 1200 ग्राम असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
“बाळाचे वजन कमी असल्या कारणाने त्यांना श्वसन प्रक्रियेत त्रास होत आहे. आम्ही त्यांना वाचविण्यासाठी पूर्णत प्रयत्नशील आहोत” तेथील डॉक्टर राकेश शर्मा यांनी सांगितले. सपना यांनी 4 मुलींना जन्म दिल्याने याची चर्चा गावात तसेच जिल्ह्यात सर्वत्र होत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.