काल दिनांक 28 सप्टेंबर रोजी आयपीएलच्या इतिहासातील एक रोमांचक सामना पहायला मिळाला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये झालेल्या सामन्यात आरसीबी ने सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवला. मुंबईचा फलंदाज ईशान किशनच्या 99 धावाच्या खेळीमुळे मुंबईने सामन्यात विजय मिळवला नसला तरी हातातून निसटलेल्या या सामन्याला त्याने विजयाच्या समीप नेऊन सोडले होते.
स्वतःच्या संघाने सामना हरला असला तरी एक हिरो म्हणून ईशान किशन समोर आला. शेवटच्या 10 ओव्हर मध्ये तब्बल 139 धावा काढायच्या असताना ईशान ने पोलार्ड सोबत धुवाधार खेळी खेळत सामना टाय केला. याच ईशान किशनच्या गर्लफ्रेंडला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तिच्या सौंदर्याची गेल्या काही आयपीएल मध्ये देखील चर्चा झाली होती.
ईशान किशनच्या गर्लफ्रेंड चे नाव अदिती हुंदिया असून ती एक मॉडेल आहे. अदिती ने 2017 मध्ये फेमिना मिस इंडियाची अंतिम स्पर्धक होती, तसेच तिने मिस सुपरानॅशनल इंडिया, 2018 चा किताब पटकाविला होता. तिच्या फोटोज् युवा पिढीसाठी आकर्षण ठरीत असते. ईशान व अदिती गेल्या 2 वर्षापासून एक मेकांना डेट करीत असल्याचे समजते.
खरे तर अदितीला सर्वांनी यापूर्वी क्रिकेट सामना चालू असताना स्टेडियम मध्ये पाहिले होते. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स टीमला सपोर्ट करण्यासाठी अदिती आली होती. त्यावेळी तीचे खूप फोटोज् व्हायरल झाले होते. तिने त्यावर बोलताना म्हटली, “मला असे प्रसिध्दी मिळवायची नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जायचं आहे.”
कालच्या ईशानच्या तुफानी खेळी नंतर अदिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण काल अदितीने तिच्या इंस्टा स्टोरी मध्ये ईशान चा व्हिडिओ टाकत आय एम सो प्राउड ऑफ यू बेबी असे कॅपशन टाकले. अदिती ही ईशान पेक्षा एक वर्षाने मोठी असून ती 23 वर्षाची आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करुन कळवा व शेयर करायला विसरू नका.