गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या वरील संकटे वाढत गेली व शेवटी एनसीबीकडून रियाला अमली पदार्थ खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सुशांत प्रकरणाचा योग्य निकाल लागावा यासाठी जगभरातून “जस्टीस फॉर सुशांत” ही मोहीम राबविली गेली. परंतु आता रियाला अटक होताच काही कलाकार रियाच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
रियाला खोट्या आरोपाखालीअटक करण्यात आली आहे, असे या सेलिब्रिटींचे म्हणणे आहे. या मध्ये यामध्ये सर्वप्रथम रियाची जवळची मैत्रीण क्रिकेट समालोचक शिबानी दांडेकर व शिबानीचा बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर यांनी रियाला पाठिंबा दिला. तसेच, विद्या बालन, मलायका अरोरा, शबाना आझमी, अनुराग कश्यप, श्वेता बच्चन नंदा अशा काही कलाकारांनी देखील रियाला पाठिंबा दर्शविला आहे.
“रोझेस आर रेड, वायलेट आर ब्ल्यू, लेट्स स्मॅश द पेट्रिआकि, मी अँड यू” अशा संदेशाच्या पोस्ट या सर्व सेलिब्रिटींनी केली आहे व कॅप्शन मध्ये “जस्टीस फॉर रिया” असे हॅश टॅग वापरून ट्रेंड सुरू केला आहे. या सामाजिक व्यवस्थेमध्ये महिलांना पुरुषांसारखा महिलांना योग्य न्याय मिळत नाही, असा त्यामागचा हेतू आहे.
हिंदी प्रमाणेच एका मराठी अभिनेत्रीने देखील अशीच पोस्ट करून धाडस दाखविले. अभिनेत्री ईशा केसकर हिने ती पोस्ट तिच्या इंस्टा अकाऊंट वर पोस्ट केली. यासाठी तिला अनेकांनी ट्रोल केले. त्यानंतर ईशाला कमेंट सेक्शन प्रायव्हेट करावे लागले. स्त्री पुरुष समान न्याय असावा या हेतूने ईशा ने पोस्ट केल्याचे समजते.
दुसरीकडे सुशांतच्या बहिणीने यासंदर्भात पोस्ट करताना त्याच वाक्याला उलटे करून सत्याला साथ देण्याचे आव्हान केले. तसेच तिने, “इतके दिवस कोणीही काही म्हटले नाही व अचानक हे सगळे बाहेर कसे आले. सत्य समोर येईल तेंव्हा हे सर्व कुठे असतील ते पाहुयात.” असे बोलून समाचार घेतला.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि शेयर करायला विसरु नका