सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास चालू असतानाच या प्रकरणाचे ड्रग्स कनेक्शन असल्याचे उघड झाले. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची एनसीबी कडून चौकशी करण्यात आली. आता आणखीन एक मोठी माहिती समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.
मागील काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसून आला. करण जोहरच्या घरातील या पार्टीमधील त्या व्हिडिओ मध्ये बॉलीवुड मधील अनेक मोठे कलाकार होते. दीपिका, रणवीर कपूर, विक्की कौशल, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा आणि अन्य काही कलाकार त्या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहेत. त्या व्हिडिओ चा फॉरेन्सिक रिपोर्ट आता समोर आला आहे.
फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार हा व्हिडिओ 100% खरा आहे. या व्हिडिओत कोणतीही एडिटिंग करण्यात आले नाही. त्यामुळे व्हिडिओमधील सर्व कलाकार त्या पार्टीत उपस्थित होते. एनसीबी आता व्हिडिओ मधील कलाकाराबद्दल नवीन सी ई आय दाखल करून शकते.
सध्या एनसीबी दोन प्रकरणाचा तपास करीत आहे. रीया चक्रवर्ती आणि बॉलीवुड चे ड्रग्स कनेक्शन या प्रकरणानंतर एनसीबी आता करण जोहरच्या घरातील पार्टीची चौकशी करू शकतात. कारण या पार्टी मध्ये देखील ड्रग्स चे सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोप सिद्ध झाल्यास सर्वांना अटक देखील होण्याची शक्यता आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.