दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे एकच गोंधळ उडाला होता. त्या व्हिडिओत एका पेशंटचा मृत्यू झाला असताना नातेवाईक व मित्रमंडळीकडून मृत्यू झाला नसल्याचे म्हणत होते व स्टाफ ना अर्वाच्य भाषेत बोलल्याचे दिसत होते.
सदर व्हिडिओ मुंबईतील केईएम हॉस्पिटल मधील होता. त्या हॉस्पिटल मधील एका पेशंटला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते व ई सी जी वरील समान लाईन देखील नातेवाईकांना दाखविण्यात आले होते. परंतु पेशंटच्या नातेवाईकांनी तेथील महिला डॉक्टरला शिवीगाळ करीत व्हेंटिलेटर परत चालू करण्यास सांगितले. व्हेंटिलेटर चालू केल्यानंतर नातेवाईकांनी एक मोठा गैरसमज करून घेतला.
छातीची हालचाल ही कृत्रिम श्वासोच्छ्श्र्वासामुळे होऊ शकते आणि यालाच त्या नातेवाईकांनी पेशंट जिवंत असल्याचे गृहीत धरून हॉस्पिटल मध्ये धिंगाणा केला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून समाजात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. परंतु आता तेथील डॉक्टरांनी या प्रकरणाचा व नातेवाईकांच्या त्या व्यवहाराचा जाहीर निषेध केला आहे.
केईएम हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी या संदर्भात भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना या प्रकरणात लक्ष घालून त्या व्यक्तींना अटक करण्याचे आव्हान केले आहे. अशा कठीण परिस्तिथी मध्ये डॉक्टरांवर हल्ले वाढणार असतील तर आम्ही काम बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.