सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करीत असताना या प्रकरणाचा ड्रग्स सोबत संबंध असल्याचे उघड झाले. तेंव्हापासून अनेकांनी मिडीयासमोर येऊन बॉलीवुड चे अनेक मोठे मोठे कलाकार ड्रग्स घेत असल्याचे बोलून दाखविले आहे. आता बॉलिवूडच्या एका अभिनेत्री ने मीडियासमोर येऊन मोठा खुलासा केला आहे.
बॉलिवुडची अभिनेत्री नुपूर मेहता हिने गेल्या काही दिवसांपासून काही वृत्त वाहिन्यांना मुलाखती देऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. मुलाखती दरम्यान तीने बॉलीवुड पासून क्रिकेट पर्यंत अनेक जण ड्रग्सचे सेवन करीत असल्याचे गंभीर आरोप लावले आहेत.
नुपूरच्या म्हणण्यानुसार अल्कोहोल पेक्षा ड्रग्स शरीरासाठी कमी हानिकारक असते. कारण अल्कोहोल पिल्याने फॅट वाढते, चेहऱ्यावरील इफेक्ट होतो. त्यामुळेच हे सर्वजण ड्रग्सला पसंती देतात. मला माहिती नाही ड्रग्स कोठून येते परंतु अनेक जण ड्रग्स चे सेवन करतात हे मात्र नक्की आहे.
नुपूर मेहता हिने आबरा का डाबरा, जो बोले सो निहाल अशा काही चित्रपटातून प्रेक्षकांना दिसून आली आहे. तसेच काही टीव्ही जाहिरातीत पण तीने काम केले आहे. तीच्या या आरोपामुळे बॉलीवुड मध्ये नशेडी लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले असणार हे नक्की..
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..