सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर तपास सुरू असताना बॉलिवुडचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तर कंगना राणावत हिने केलेल्या आरोपनंतर एकच खळबळ माजली होती. आता यामध्ये पायल घोष या अभिनेत्रीने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.

Payal Ghosh on anurag


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पायल घोष हिने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा शेयर केला आहे. 2014 या वर्षी अनुराग कश्यप ने पायल सोबत गैरवर्तणूक केल्याचे स्वतः पायल ने म्हटले आहे. पायल त्यावेळेस पहिल्यांदा अनुरागला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिस वर गेली होती. त्यावेळी अनुराग सोबत तिची भेट झाली नव्हती.

Payal Ghosh on anurag

पायल ने बोलताना सांगितले, “दुसऱ्या दिवशी अनुराग ने मला स्वतः फोन करून ऑफिस वर बोलावून घेतले. फोनवर बोलताना अनुराग ने सिंपल कपडे घालून येण्यास सांगितले. अभिनेत्री दिसशील असे काही करू नकोस असे अनुराग ने म्हटले. त्यामुळे मी सलवार घालूनच अनुरागला भेटण्यास निघाले.”


मी तिथे गेल्यानंतर अनुराग ने मला सोबत जेवण करण्यास सांगितले. आम्ही दोघांनी जेवण केल्या नंतर अनुराग ने स्वतः माझी प्लेट उचलली. जेवणानंतर मी त्या दिवशी घरी परत गेले. नंतर परत अनुराग ने मला घरी भेटण्यास बोलविले. खूप रात्र झाली असल्याने मी आत्ता येऊ शकणार नसल्याचे सांगितले, असे पुढे बोलताना पायलने सांगितले.

Payal Ghosh on anurag

पुढे पायल म्हणाली, “2 दिवसानंतर अनुराग ने परत मला बोलविला. मी गेल्यास त्यावेळी त्याने मला एका रुममध्ये नेला. तिथे त्याने मला वाईट प्रकारचे व्हिडिओ दाखवू लागला. मी खूपच घाबरले होते. अनुराग ने स्वतःचे कपडे काढून मला ही काढण्यास सांगितले. मला ठीक नाही वाटत हे असे मी त्याला म्हटले.”

Payal Ghosh on anurag

“मला अनुराग म्हणू लागला मी ज्या अभिनेत्रीसोबत काम केलं आहे त्यांना एक कॉल केल्यास माझ्या कडे येतात. पण मी तिथून स्वतःची सुटका करून निघून आले. पण आजही तो क्षण आठविल्यास खूप भीती वाटते.” असा खळबळजनक आरोप पायल ने अनुराग कश्यप याच्या बाबतीत केला आहे. या संदर्भात पायलने वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये काल एफआयआर दाखल केली आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *