झी मराठी वाहिनीवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका खूपच गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने उत्तम भूमिका साकारल्या. परंतु आता या मालिकेतील एका अभिनेत्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
कोंडाजी बाबा यांना मुरुड जंजिरा किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी मदत अब्दुला दळवी यांनी मदत केली होती. “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेत अब्दुल्ला दळवी हे पात्र साकारणारे कलाकार प्रशांत लोखंडे यांचे काल 14 सप्टेंबर रोजी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांचे कमी वयातच जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्रशांत लोखंडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या उत्तम कलाकाराच्या अचानक जाण्याने मित्र परिवार व अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अब्दुला दळवी यांचा “बाद में कटकट नको” हा डायलॉग प्रशांत लोखंडे यांनी प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवला. अब्दुला दळवींच्या पात्राला प्रशांत यांनी उत्तम न्याय दिला होता.
प्रशांत यांनी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत “बाजी घोरपडे” हे पात्र देखील उत्तमरित्या साकारले होते. दोन्ही मालिकेच्या टीम कडून व जगदंब क्रिएशनच्या परिवाराकडून प्रशांत लोखंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. “मर्द मराठी” तर्फे प्रशांत लोखंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सर्वांनी कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली द्या व शेयर करायला विसरू नका.