सोशल मीडियावर सर्वत्र कपल चॅलेंज पाहायला मिळत आहे. ज्यात सर्वजण स्वतःची फोटो जोडीदारासोबत पोस्ट करताना दिसून येत आहेत. या चॅलेंज मुळे कधी न फोटो टाकणारे सुध्दा उत्साहाने पती किंव्हा पत्नी सोबत फोटो टाकताना दिसून येत आहेत.

pune police
credit: pune police


पुणे पोलिसांनी याचीच दखल घेत एक भन्नाट ट्विट केले आहे. पोलिसातर्फे वेळोवेळी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो की महिलांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू नये. तरीही याचे भान न ठेवता लोक सर्रास कपल चॅलेंज स्विकारताना दिसून येत आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांनी तुमच्या फोटोज् क्रिमिनल पासून दूर राहो, असे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

pune police viral tweet


पुणे पोलिसांकडून केलेल्या ट्विट मध्ये असे लिहिले होते, “तुमच्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना दोन वेळा विचार करा. जर सावधानता नाही बाळगली तर एक गोड चॅलेंज चुकीचे ठरू शकते. सावधान राहा. तसेच सोबत पुणे पोलिसांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

त्या फोटो मध्ये त्यांनी टोमणा मारताना असे लिहिले, “कपल चॅलेंज वाल्यांना सायबर क्रिमिनल वाले चॅलेंज न करो. त्यांनी चॅलेंज केला तर कपल चा खपल चॅलेंज होईल.” तसेच त्यांनी तुमच्या फोटोज् चा गैरवापर देखील होवू शकतो असे सांगितले आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटमुळे अनेक कपल्स ना सावध केले हे नक्की.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *