संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिलेल्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच संशयाच्या घरात सापडलेली रिया चक्रवर्ती हिला अखेर एनसीबी कडून अटक करण्यात आले आहे. सलग तीन दिवस रियाची चौकशी केल्यानंतर काही आरोप सिद्ध झाल्याने रियाला अटक करण्यात आली आहे.
सुशांत सिंगच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करत असताना रियाचा अमली पदार्थ खरेदी करण्यात व सेवन करण्यात संबंध असल्याचे उघड झाले होते. एनसीबी नेरी याला अटक केल्याची बातमी समजताच सुशांत ची बहिण श्वेता सिंग हिने पोस्ट केली. “देव आपल्या सोबत आहे” अशी पोस्ट श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर केली. या पोस्ट वर अंकिता लोखंडेने कमेंट देखील केली.
अंकिता लोखंडे हिने देखील रियाच्या अटकेवर आनंद व्यक्त करताना रियाला अप्रत्यक्षरीत्या खडे बोल सुनावले. “योगायोगाने काहीच घडत नाही. आपण स्वतःच आपले नशीब घडवीत असतो. तेच कर्मा आहे,” असे म्हणत अंकिता ने रिया चक्रवर्ती ला टोला लगावला आहे.
काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती अंकिता व सुशांतच्या परिवारावर आरोप करताना दिसून आली होती. परंतु तिचे सर्व मनसुबे असफल ठरले. एनसीबीच्या तपासात रियाने सुशांतला देखील ड्रग्स दिले असल्याचे कबूल केले आहे. एनसीबीचा आरोप जरी सिद्ध झाला असला तरी रियाची संकटे आणखीन कमी झाली नाहीत. कारण सीबीआय व ईडीकडून रियाची चौकशी केली जाऊ शकते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करुन कळवा व शेअर करायला विसरू नका..