अमली पदार्थ खरेदी व सेवन केल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने धक्कादायक माहिती उघड केल्याचे सूत्राकडून समजते. एनसीबीच्या ताब्यात असलेल्या रियाला विचारपूस करण्यात आली. यात तिने अनेक व्यक्तीचे नाव सांगून पितळ उघडे केले आहेत.
रियाची चौकशी केली असता रियाने बॉलीवुड मधील अनेक दिग्गज सुशांत सोबत ड्रग्स घेत असल्याचे म्हटले आहे. या मध्ये तिने 2 तरुण अभिनेत्याचे नाव देखील उघड करून खळबळ माजवून सोडली आहे. या व्यतिरिक्त बॉलीवूड संबंधित आणखीन 25 ते 30 नावे देखील रियाने एनसीबी समोर उघड केले आहेत.
रियाच्या जबाबानंतर बॉलीवूड मध्ये एकच खळबळ माजली आहे. ते 25-30 व्यक्ती एकत्र येऊन पार्टी करायचे व पार्टी मध्ये ड्रग्स चे सेवन करीत असल्याचा खुलासा देखील रियाने केला आहे. यामध्ये रियाने एका महिलेचा देखील समावेश असल्याचे म्हटले आहे. रियाने 15 पानाचे जबाब स्वतः हाताने लिहून दिले आहे.
रिया चक्रवर्ती हिने 2 लोकप्रिय अभिनेत्री व महिला फॅशन डिझायनर चे नाव सांगितल्याचे सूत्राकडून कळले आहे. सारा अली खान, रकुल प्रीत, सिमोण खंब्बत्ता या तिघी रिया व सुशांत सोबत ड्रग्सचे सेवन करायचे असा मोठा खुलासा रियाने एनसीबी ला सांगितल्याचे समजते.
यासोबतच रीयाने एका मोठ्या चित्रपट निर्मात्याचे देखील नाव सांगितले असल्याचे सूत्रांकडून कळते. या निर्मात्याचा राजकारणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे व तोच सुशांतला पार्टीला घेऊन जायचा. तिथूनच सुशांतला ड्रग्सची सवय लागली असल्याचे रीया ने म्हटले आहे. यामुळे या प्रकरणात बॉलीवूड मधील अनेक मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.