सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर रिया चक्रवर्तीला एनसीबी कडून अटक करण्यात आली. तिच्यावर अमली पदार्थांचे खरेदी केल्याचा व सेवन केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. परंतु अटक होण्यापूर्वी रियाने, “मला अटक झाली तरी तर मी माझ्या गॉडफादर चे पण नाव उघड करेल”, अशी धमकी दिली होती.
रियाने दिलेली धमकी नक्की कोणासाठी होती हे अद्याप कळू शकले नाही. परंतु, रियाला ज्यावेळी अटक करण्यात आली, त्यावेळी रियाने काहीतरी संदेश असलेले टी शर्ट परिधान केले होते. त्या संदेशातून तीने तिला झालेल्या अटकेचा निषेध करीत असल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखविले.
त्या टी शर्टवर, “रोझेस आर रेड, वायलेट आर ब्ल्यू, लेट्स स्मॅश द पेट्रिआकि, मी अँड यू” असे प्रिंट केलेले होते. कदाचित हा संदेश तीने तीच्या जवळच्या व्यक्तींना दिला असावा. कारण तिच्या जवळच्या सर्व मित्रांनी हाच संदेश सोशल मीडियावर पोस्ट करीत रियाला न्याय मिळावा अशी मागणी केली.
पुरुष व स्त्री यांच्याबाबतीत न्याय व्यवस्थेत भेदभाव केला जाऊ नये, असा त्या मागील उद्देश आहे. तो संदेश रविना टंडन, विद्या बालन, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर आदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिला आहे. या सेलिब्रिटीज नी रियाला पाठिंबा द्यायला इतका उशीर का केला, असे प्रश्न नेटकऱ्या कडून केले जात आहेत..
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.