सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा ड्रग्स शी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर यासंबंधी एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक व अन्य काहींना अटक करण्यात आली. या प्रकरणात रिया कायम सांगत होती की तिने ड्रग्जचे सेवन केले नाही. तीच्या वकिलाने तीला जामीन मिळावी यासाठी प्रयत्न केला परंतू न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.
वारंवार ड्रग्स घेतले नसल्याचे म्हणणाऱ्या रियाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये रिया व सुशांत सिंग राजपूत हे ड्रग्स चे सेवन करीत असल्याचा दावा झी न्यूज या वृत्तवाहिनीने केला आहे. त्यामुळे रियाचा खोटेपणा उघड झाला आहे.
व्हिडिओ बनविणारा व्यक्ती सुशांतला असे विचारताना दिसत आहे, हे चरस आहे का? सुशांत ने त्यावर उत्तर देताना म्हटले, “हे चरस नाही, हे VFX आहे. हे घेतल्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट प्रमाणे स्पेशल इफेक्ट झाल्यासारखे वाटते.” या व्हिडिओ मध्ये रीया ने “ही एक रोल सिगारेट आहे.”
आणखीन एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ मध्ये सुशांत, रिया व अन्य काहीजण भजन गाताना दिसून येत आहे. भजन गाताना सुशांत नशेत असताना दिसून येत आहे. एनसीबी साठी हा एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. तसेच, रियाने स्वतः काही मोठे नावे जबाबात सांगितले आहेत. त्यामुळे अन्य काहींना अटक होण्याची शक्यता आहे.
या बातमीसाठी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.