तीन महिन्यापूर्वी 21 जून रोजी देशात सर्वत्र कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले होते. कित्येक वर्षांनंतर पाहायला मिळालेला हा एक दुर्मिळ योगच होता. वर्षातील या दुसऱ्या सूर्यग्रहणात इस्लामपूर येथील एका महिलेने ग्रहण चालू असताना एक मोठे धाडस केले होते.

Samruddhi Jadhav new


समृध्दी चंदन जाधव या विवाहित महिलेने स्वतः गर्भवती असताना ग्रहणा संबंधी असलेले सर्व नियम मोडून काढले होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या एका पथकाच्या सांगण्यानुसार तीने lफळे कापली, भाजी चिरली, झाडाची फळं व पाने तोडली, हाताची घडी घालून बसल्या, तसेच स्वतः चष्मा घालून सूर्यग्रहण देखील पाहिले होते.

Samruddhi Jadhav new


ग्रहणासंबंधी समाजात असलेल्या अंधश्रध्देला फाट्यावर मारीत समृध्दी जाधव यांची प्रसूती झाली आहे. प्रसूतीनंतर समृध्दी व तीचे बाळ एकदम ठणठणीत व सदृढ असल्याची माहिती समोर आली आहे. समृध्दी हिला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिचा व तीच्या बाळाचा फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

Samruddhi Jadhav new

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगण्यावरून समृध्दीने केलेल्या या धाडसाचे सर्वत्र चर्चा होत आहे. याबाबतीत बोलताना समृध्दीने सांगितले, “ग्रहणाचा माझ्यावर किंव्हा माझ्या बाळावर कोणताच परिणाम झाला नाही, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे यापुढे ग्रहणा वेळी मी व माझे कुटुंब समाजात प्रबोधन करणार आहोत”. समृद्धीच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले तर काहींनी अजूनही विरोध केला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *