गेल्या काही वर्षांपासून भारतातील तरुण वर्गाला योग्य दिशा दाखविण्याचे काम संदीप महेश्वरी ही व्यक्ती उत्तमरीत्या पार पाडत आहे. आपल्या बोलण्याच्या उत्तम शैलीतून संदीप अनेकांना सकारात्मक जीवन जगायला शिकवले. म्हणूनच संदीपला आज भारतातील उत्तम वक्त्या पैकी एक गृहीत धरले जाते.
संदीप महेश्वरी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1980 रोजी दिल्लीच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षण अर्धवट सोडून संदीप ने 20 व्या वर्षापासून फोटोग्राफीला सुरुवात केली. नंतर 2006 मध्ये त्याने “इमेज बाजार” नावाची वेबसाईट सुरू केली व अल्पावधीतच तो करोडपती झाला. देश विदेशातील सर्व फोटोज् त्या साईट वर मिळतात.
दरम्यान अकरावी वर्गात असताना त्याचे रूची नावाच्या मुलीशी प्रेम जुळले होते. खरे तर सुरुवातीला रूची ला संदीप आवडला होता. हो गोष्ट संदीप ने अनेक वेळा आपल्या स्पीच मधून बोलून दाखविली आहे. संदीपची पत्नी ही दिसायला खूपच सुंदर असून ती बॉलीवुड मधील अनेक हिरोईनला सोंदर्याबाबतीत मागे टाकेल.
संदीप व रुचा ला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. इमेज बाजार या साईटचे वार्षिक उत्पन्न 11 करोड रुपये असताना संदीपने अनेकदा लोकांसाठी फुकट सेमिनार घेतले आहेत. संदीप नेहमी म्हणतो, “जर तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल तर ते अशा लोकांना वाटा ज्यांना गरज आहे.” संदीपच्या सेमिनार मुळे अनेकांना जगण्याची नवीन आशा मिळत असते.
संदीप व रुचाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.