अनेक कलाकार हे मालिकेत किंवा चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर प्रेमात पडतात व त्यातले काहीजण विवाहबंधनात देखील आढळतात. 2012 या वर्षी गाजलेली लोकप्रिय मालिका “देवयानी”च्या अभिनेत्यासोबत असेच काही तरी घडले. मालिकेचा अभिनेता संग्राम साळवी याला त्या मालिकेतूनच भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.
“तुमच्यासाठी काय पण” हा संग्रामचा त्या मालिकेतील डायलॉग सर्वत्र लोकप्रिय झाला होता. संग्राम व शिवानी सुर्वे यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यानंतर संग्राम ला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्या मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या सोबत त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले.
रियाच्या घरी गेलेले ते अधिकारी आहेत या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे पती..
खुशबू तावडे ही देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. “आम्ही दोघी” या गाजलेल्या मालिकेत देखील तिने काम केले आहे. तसेच “तेरे बिन”, प्यार की एक कहाणी अशा हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेत देखील तिने भूमिका साकारली आहे. पोपटलाल ची होणारी पत्नी म्हणून बुलबुल नावाचे पात्र तीने साकारले होते.
काही वर्ष प्रेमात राहून संग्राम व खुशबू चा 28 एप्रिल 2017 रोजी साखरपुडा झाला होता. हा साखरपुडा त्यांनी दिव्यांग मुलांच्या शाळेत मुळासमवेत केला होता. मूळचा कोल्हापूरचा असणारा संग्राम याने नंतर खुशबू सोबत 5 मार्च 2018 रोजी विवाह केला. आज खुशबू तावडेचा हिचा वाढदिवस आहे. तिला मर्द मराठी तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.