santosh juvekar

सोशल मीडियावर अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांना कोणत्या ना कोणत्या गोष्टी बाबतीत ट्रोल केले जाते. काहींना त्यांच्या चुकीमुळे ट्रोल केले जाते, तर काहींना विनाकारण नेटकऱ्यांकडून उलट सुलट प्रतिक्रिया मिळालेल्या दिसतात. त्यामुळे कधी कधी न राहवून कलाकारांना अशा ट्रोलर्सना उत्तर द्यावे लागते.

santosh


असाच एक अनुभव मराठी अभिनेता संतोष जूवेकर याच्या बाबतीत दिसून आला आहे. संतोष ने त्याच्या फेसबुक अकाऊंट वर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटो मध्ये संतोष ने दाढी मिशा काढलेला दिसून येत आहे. फोटोच्या कॅप्शन मध्ये, “बऱ्याच दिवसांनी दाढी भादरलीय” असे लिहिला होता. त्यावर अनेक फॅन्स नी त्याची प्रशंसा केली.

santosh juvekar news


वरील फोटोवर संभाजी पाटील या नेटकऱ्याने “मिश्या काढल्यामुळे छक्यासारखा दिसतोय” अशी कमेंट केली. याला रिप्लाय देताना संतोषने, “मित्रा जे नाव टीका करण्यासाठी उच्चारला आहेस, त्या नावात खूप मोठी ताकद आहे. पुरुष आणि आदिशक्ती स्त्री या दोघांचीही ताकद सामावली आहे ना, तो देवाचा आणि निसर्गाचा अविष्कार आहे हे नाव. आदर करतो मी त्याचा. तुही कर आणि खरा पुरुष हो भावा.”

हि कमेंट नंतर त्या मुलाने डिलीट केली. परंतु संतोष ने त्याची स्क्रीनशॉट काढून परत पोस्ट केली. यावर अनेकांनी संतोषच्या या सुंदर रिप्लाय ची प्रशंसा केली. मागे असेच एका महिलेनं गिरीश ओक यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कलाकारांना उलट सुलट कमेंट करने हे काही नवीन गोष्ट नाही. परंतु सध्या संतोषची सर्वत्र वाहवाही होत आहे.

santosh juvekar news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *