सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास चालू असतानाच बॉलिवूडचे ड्रग्स कनेक्शन असल्याचे उघड झाले. एनसीबीच्या कार्यवाहीत रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक व काही ड्रग्स विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर बॉलिवुडच्या अनेक मोठ्या नाव यात अडकण्याची शक्यता आहे.
आता याच प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तीच्या व्यक्तव्याने बॉलीवुड मधील आणखीन काही मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. शर्लिनने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर एक पोस्ट करताना तिला बॉलिवुडच्या पार्टी मधील अनेकांनी ड्रग्स घेण्यासाठी विचारणा केल्याचे म्हटले आहे.
शर्लिन ने तीच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ कॅप्शन मध्ये असेही लिहिले, “मी अगोदर सिगारेट ओढायची, 2017 ला मी ते ही सोडले. मी कधी तरी मद्यपान करते. मला इंडस्ट्री वाले ड्रग्स घेण्यासाठी विचारायचे परंतु मी घ्यायचं नाही असे ठरविले”.
शर्लिन ने केलेल्या या खुलास्यामुळे ड्रग्स माफियांवर टांगती तलवार उभी राहिली असणार हे नक्की. आपल्या बोल्ड फोटोज् आणि व्हिडिओज मुळे कायम चर्चेत असणाऱ्या शर्लिनच्या या व्यक्तव्यात किती सत्यता आहे, ते लवकर कळेलच. दुसरीकडे रियाने दिलेल्या 25 नावांमध्ये कोण कोणते सेलिब्रिटी आहेत, हे येत्या काही दिवसात लवकरच मिडीयासमोर येणार हे नक्की. तसेच, कंगना राणावत ने केलेल्या आरोपांमुळे देखील बॉलिवुडचे नाव धुळीस मिळाले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.