गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुडबद्दल जनतेच्या मनात संताप पाहायला मिळाला. सुशांत सिंग मृत्यू प्रकरण, ड्रग्स प्रकरण, नेपोटिस्म हा सर्व गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ने तिला मिळत असलेल्या वाईट कमेंट्स आणि मेसेजेस बद्दल आवाज उठविला आहे.
सुहाना ने काही स्क्रीनशॉट पोस्ट करीत तिच्या सावळ्या रंगावर होत असलेल्या कमेंट्स/मेसेजेस वर आवाज उठविला आहे. ती कॅप्शन मध्ये असे लिहिले, “सध्या बर्याच गोष्टी चालू आहेत आणि आता ही एक समस्या आहे जी सोडवायला हवी. हे फक्त माझ्याबद्दल नाही, तर विनाकारण याबद्दल ग्रस्त असलेल्या सर्व मुला-मुलींबद्दल आहे.”
“माझ्या दिसण्याविषयी इथे काही कमेंट्स केलेल्या आहेत. जेव्हा मी 12 वर्षांची होते, तेव्हा मला अनेकांनी सांगितले की मी त्वचेच्या स्वरुपामुळे कुरूप दिसते. दुःखाची गोष्ट म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्या सर्वांचा सावळा रंग आहे. होय, आम्ही वेगवेगळ्या रंगात आलो आहोत, परंतु आपण कितीही मेलेनिनपासून दूर राहायला पाहिलं तरी आपण राहू शकत नाही,” असे पुढे सुहाना ने म्हटली.
सुहानाने पुढे रंग भेदभाव कमी करा असे आवाहन करताना ‘काळी, तू गोरी कशी झाली.’ ‘ ये काळी भुतीन’, ‘ तू खूप जास्त कुरुप आहेस’ असे अनेक मेसेज सुहानाला आलेले तिने सांगितले. “मी खूपच आनंदी आहे माझ्या सावळ्या रंगाला घेऊन आणि तुम्ही पण आनंदी असायला हवे.” सुहानाच्या या पोस्टला अनेक सेलेब्रिटी ने शेयर केले व अनेकांनी तिला यासाठी शाबासकी देखील दिली.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व कमेंट करायला विसरू नका.