स्वतःच्या हिंमतीवर बॉलीवुड मध्ये नाव कमवलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी गेल्या तीन महिन्यात अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या दिसून आल्या. सुशांतची आत्महत्या नसून हत्या असावी असा आरोप सर्वच स्तरातून केला जात होता. पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

sushant rajput death reason


या प्रकरणाच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाअंती सुशांत ने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले होते. परंतु सुशांतच्या घरच्यांनी मुंबई पोलिसांच्या निर्णयाशी असहमत असल्याचे सांगत सीबीआय चौकशीची मागणी केल्याने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश मिळाले. दरम्यान सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब (सीएफएसएल)ने मोठी माहिती स्पष्ट केली आहे.

sushant sing rajput new video


सीएफएसएलच्या नव्या अहवालानुसार सुशांतची हत्या करण्यात आली या संदर्भात कोणतेच पुरावे सापडले नाहीत. सीबीआय ने देखील सत्य समोर आणण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा घटनाक्रम त्याच्या घरी जाऊन परत एकदा करून पाहिला. त्यातून काहीच सिद्ध होवू शकले नाही.

sushant sing rajput new video

मृत्यूचा घटनाक्रम परत केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूचे खरे कारण पार्शियल सुसाईड असल्याचे सिद्ध झाले आहे. पार्शियल सुसाईड म्हणजेच फाशी घेताना सुशांतचे पाय पूर्ण हवेत नव्हते. म्हणजेच बेडवर त्याचे पाय टेकले होते. ज्या कपड्याने आत्महत्या केली त्या कपड्याला पाहूनच ही आत्महत्या असल्याचे रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

sushant rajput death reason

हा रिपोर्ट सीबीआय कडे पोहोचल्यास सीबीआय या प्रकरणाची अधिकृत घोषणा करून हे प्रकरण लवकरच संपवू शकते. जरी ही आत्महत्या असली तरी या प्रकरणामुळे बॉलिवुडची नशा करणाऱ्या अनेक कलाकारांचा खरा चेहरा समोर आला.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *