सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर या प्रकरणात मोठे मोठे खुलासे होताना दिसून येत आहेत. रिया चक्रवर्तीचे व्हाट्सअपचे मेसेजेस व्हायरल झाल्यानंतर या या प्रकरणाचा ड्र.ग्स शी संबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. म्हणून यासंबंधी चौकशी साठी “नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)” यांना हस्तक्षेप करावे लागले.

sushant sing case status


एनसीबीला रियाच्या मेसेजेस मधून संशय होता की रिया अमली पदार्थाची खरेदी व सेवन करीत असेल. परंतु अद्याप रीया बद्दल या संबंधित पुरावे भेटले नाहीत. तसेच, बॉलीवूड मधील अन्य काही सदस्य देखील अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचा एनसीबी ना संशय होता. यामुळे या सर्वांना हे अमली पदार्थ नेमके कोण सप्लाय करतो याची माहिती अखेर त्यांनी शोधून काढली.

sushant sing case status


एनसीबीच्या टीमला चिंकु पठाण उर्फ परवेज खान या व्यक्तीवर संशय होता. यामुळे एनसीबीच्या एका पथकाने मुंबईत दोन ठिकाणी छापा टाकून परवेज खान व अन्य एकाला अटक केली आहे. परवेज खानची चौकशी केली असता त्याचा रिया व तीचा भाऊ शौविक यांच्याशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे.

sushant sing case status

परवेजच्या विधानानंतर रिया व शौविक यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही तासात या मोठ्या हालचाली झालेल्या पाहायला मिळू शकतात. तसेच, परवेज खानचा बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांशी देखील संबंध असण्याची शक्यता आहे.

sushant sing case status

माहिती कशी वाटली ते कमेंट करुन कळवा व शेअर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *