गेल्या अडीच महिन्यांपासून बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर सर्वत्र त्याची चर्चा होताना दिसत आहे. सुशांत ने आपल्या छोट्याश्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव घेतला होता. काही काही गोष्ट तो अगदी मनापासून करायचा व त्या तो परिपक्वही होता.
सुशांतची बहिण श्वेता सिंग ही तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सुशांतचे अनेक व्हिडिओ पोस्ट करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी सुशांतचा त्याच्या c4 बहिणी सोबतचा व्हिडिओ देखील श्वेता ने शेयर केला होता. आता श्वेताने सुशांत एका कागदावर काहीतरी लिहीत असलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
श्वेता सिंगने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये सुशांत एकाच वेळी दोन्ही हाताने काहीतरी लिहीत आहे. परंतु डाव्या हाताने साधारण शब्द लिहीत आहे व उजव्या हाताने त्या शब्दांना उलटे लिहीत आहे. म्हणजेच जर ते उलटे शब्द आरशात पाहिल्यास सरळ दिसतील. व्हिडिओ मध्ये सुशांतने “नथिंग इज इम्पॉसिबल” हे लिहिले आहे.
श्वेताने पोस्टच्या कॅप्शन मध्ये “रेअर जिनियस” असे लिहिले आहे व जगातील फक्त 1% टक्के लोकच हे असे लिहू शकतात असेल तिने सांगितले. या व्हिडिओला पाहून खरंच सुशांत सिंग राजपूत कोणत्याही कार्यात अव्वल होता असेच म्हणावे लागेल. अभिनया व्यतिरिक्त या माणसाने अनेक कला आत्मसात केल्या होत्या.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेअर करायला विसरू नका.