सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचे गूढ कायम राहिले असून हे प्रकरणात आता गुंतागुंतीचे होताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास चालू असतानाच काही व्यक्तींनी ड्रग्स घेतल्याचे उघड झाले. सुशांत केस मध्ये सुशांतचा अत्यंत जवळचा मित्र निर्माता संदिप सिंग याच्यावर संशय घेतला जात होता.

sushant sing rajput new video


सुशांत चा मृत्यू दिवशी संदीप हा सुशांतची बॉडी नेणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाच्या संपर्कात असल्याचे दिसून आले होते. तसेच त्याने कूपर हॉस्पिटल मध्ये पोलिसांना हाताने काहीतरी इशारा केल्याचे देखील दिसून आले होते. काही मीडिया वाल्यांनी तर संदीप सिंगच सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले होते. संदीप ने एक पोस्ट करून सर्व गोष्टीचा खुलासा केला आहे.

sushant sing rajput sandeep news


संदीप ने पोस्ट मध्ये असे लिहिले, “मी ॲम्बुलन्सच्या ड्रायव्हर सोबत मी का बोलत होतो, ते आज स्पष्ट करून त्या गोष्टीचा शेवट करायचा आहे. सर्वजण म्हणत आहेत की तुझे(सुशांतचे) कुटुंब मला ओळखत नाही. हे खरं आहे की मी तुझ्या कुटुंबाला कधीच भेटलो नाही. तुझ्या अंतिम विधी साठी एकट्या बहिणीला मदत करणे, ही माझी चूक होती का?”

संदीप ने पोस्ट मध्ये सुशांतची बहिण मीतू दीदी सोबत झालेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यात संदीप मितू दीदीला 17 जून रोजी काही हवं का असे विचारले आहे. त्याच दरम्यान ॲम्बुलन्स पैसे दिले का असे मितु ने संदीपला विचारले. त्यावर संदीप ने दिल्याचे सांगितले. यावरून संदीप फक्त ॲम्बुलन्स चालकाचे पैसे देण्यासाठी त्याच्या संपर्कात असल्याचे उघड होते.

तसेच पुढे एका पोस्ट मध्ये संदीपने असे लिहिले, “जेंव्हा मी तुझ्या(सुशांतच्या) मृत्यूची बातमी ऐकल्यास मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी घरी गेलो तेंव्हा मितु दिदी शिवाय तिथे कोणीच नव्हते. मी आणखीन विचार करतोय की तुझ्या बहिणीसोबत उभे राहून चूक केली किंव्हा मी तुझ्या दुसऱ्या फ्रेंड्स च्या येण्याची वाट पाहायला हवी होती.” संदीपच्या या पोस्ट मुळे त्याच्यावरील संशय कमी होण्याची शक्यता आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *