गेल्या वर्षभरात काही मराठी कलाकारांचा साखरपुडा तर काहींचे लग्न झाल्याचे दिसून आले. यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपानकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड यांचा समावेश होता. आता या यादीत आता आणखीन एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
मराठी टेलिव्हिजन वर आपल्या अभिनयाने ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री अभिज्ञा भावे हीचा साखरपुडा झाला आहे. अभिज्ञा ने स्वतः फोटोज् पोस्ट करून फॅन्स सोबत ही आनंदाची बातमी शेयर केली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञाने “मेहुल पै” या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. काल दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दोघांचा साखरपुडा मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थितीत पार पडला.

अभिज्ञाचा होणारा पती मेहुल पै हा एक ऑपरेशन मॅनेजर असून तो “क्लासवर्क इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. तो इव्हेंट मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट याबद्दलचा भार सांभाळत असतो. अभिज्ञा व मेहुल दोघांनी एकत्र येऊन आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.
तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना अशा लोकप्रिय मालिकेतून तसेच, चला हवा येऊ द्या या शो मधून अभिज्ञाने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या ती “रंग माझा वेगळा” या मालिकेत दिसून येत आहे. तिचे साखरपुडा झाल्याची पोस्ट करताच अनेक कलाकारांनी व फॅन्स नी तिच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला आहे. दोघांना “मर्द मराठी” तर्फे खूप खूप शुभेच्छा
तुम्हीही कमेंट मध्ये दोघांना शुभेच्छा द्या व शेयर करायला विसरू नका.