कोरोनाच्या काळात मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार रिलेशनशिप मध्ये असल्याचे दिसून आले. आता बॉलिवुड मधील 2 लोकप्रिय कलाकार आदित्य नारायण व गायिका नेहा कक्कर या दोघांनी लग्नासाठी आपापला जोडीदार निवडला आहे व दोघांनी लग्नाची तारीख देखील ठरविल्याचे ऐकायला मिळत आहे.
नेहा कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग याच्य सोबत लग्न करणार असल्याचे सांगत आहे. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे त्यांच्या पोस्ट वरून दिसून येते. परंतु दोघे खरेच लग्न करणार आहेत की कोणत्या प्रोजेक्ट चे प्रमोशन करीत आहेत यातच फॅन्स संभ्रमात आहेत.
नेहाने एका पोस्ट मध्ये हॅश टॅग वापरत “नेहू दा व्याह” असे केप्शन टाकले होते. सोबत तीने 21 ऑक्टोबर ही तारीख देखील टाकली होती. त्यानंतर नेहा ही रोहनप्रीत याच्या घरी गेली असल्याचा व्हिडिओ देखील दोघांनी पोस्ट केला. त्यावर रोहन ने असे कॅपशन टाकले होते “आज ती पहिल्यांदा माझ्या घरी आली आहे, हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे.”
नेहा खरेच लग्न करतेय का हे 21 ऑक्टोबरला कळेलच. दुसरीकडे गायक उदित नारायण यांचा सुपुत्र आदित्य नारायण हा देखील अभिनेत्री श्वेता अग्रवाल या अभिनेत्री सोबत लग्न करणार आहे. 10 वर्षापासून एकत्र असलेले दोघे 1 डिसेंबर रोजी लग्न करणार असल्याचे सूत्राकडून समजते. या दोघांनी शापित या हिंदी चित्रपटात एकत्र काम केले होते.
इंडियन आयडल मध्ये नेहा व आदित्य नारायण यांच्या प्रेमाची चर्चा झाली होती. त्यावेळी आदित्य हा नेहावर खूप प्रेम करीत असल्याचे दिसून येत होते. परंतु ते सगळे शो चा भाग असल्याचे नंतर उघड झाले होते. आता दोघांनीही आपापला जोडीदार निवडला असून लवकरच आयुष्याची नवीन इनिंग सुरू करतील.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका