झी मराठी वाहिनीवरील का रे दुरावा या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता सुयश टिळक व तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगत असायची. 1-2 वर्षांपूर्वी दोघे एकमेकांसोबतच्या फोटोज् सोशल मीडियावर देखील पोस्ट करायचे.
अक्षया व सुयश टिळक या दोघांनी आता एकमेकांना इंस्टाग्राम वर अनफॉलो केले आहे व त्यांनी एकमेकांसोबतच्या फोटोज् देखील डिलीट केल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. या होणाऱ्या अफवावरून सुयश ने लोकसत्ता या वृत्तवाहिनी सोबत बोलताना अखेर स्पष्टीकरण दिले आहे.
या मराठी अभिनेत्रीने मेहंदीचे फोटो शेयर करून फॅन्सना दिला सुखद धक्का. उद्या आहे लग्न
सुयशने बोलताना सांगितले की, “सध्या सोशल मीडियावर माझ्या रीलेशनला घेऊन खूप अफवा पसरत आहेत. माझं कोणासोबत अफेयर चालू आहे, मी कोणासोबत लग्न करतोय का, माझं ब्रेक अप झाल आहे का? याबद्दल नेहमी सोशल मीडियावर अफवा पसरवली जाते. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका”.

“कोणालाही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार नाही. माझा लग्नाचा सध्या तरी कोणता विचार नाही आहे. मी जेंव्हा लग्न करेल व कोणत्या मुलीशी करेल हे तेंव्हा ते सगळ्यांसमोर नक्की येईल. लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे, त्यामुळे वेळ येईल तेंव्हा मी सर्व काही सांगेल.”
सध्या सुयश टिळक हा कलर्स मराठी वरील शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत शंतनुच्या भूमिकेत दिसून येत आहे. “मला माझ्या खऱ्या आयुष्यातील लग्नाला शंतनुच्या शब्दात मांडायला आवडेल. लग्नाची एक वेळ यायला हवी, जेंव्हा ती येते, तेंव्हा आपोआप होवून जाते. माझे लग्न का होत नाही व कधी होईल हे प्रश्न माझ्या घरच्यांना पडतात, पण मला आणखीन पडत नाहीत. कृपया कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका”
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका