अभिनय क्षेत्रात अनेक कलाकार असतात ज्यांना अभिनयाप्रमाणेच दुसरेही काही तरी टॅलेंट असते. अभिनयातील कौशल दाखवीत असतानाच दुसरे टॅलेंट ही त्यांची आवड बनून जाते. कोणामध्ये कविता लिहण्याची, कोनामध्ये चित्र काढण्याची तर कोणामध्ये सुरेख गायनाची प्रतिभा असते.

akshya naik


कलर्स मराठी वर काही दिवसांपूर्वी “सुंदरा मनामध्ये भरली” ही मालिका सुरू झाली. या मालिकेने काही दिवसातच लोकप्रियता मिळवली. मालिकेने देखील सुंदरा मुद्दा उपस्थित करून सुंदर सुरुवात केली आहे. मालिकेची अभिनेत्री अक्षया नाईक हिने लतिकाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. अक्षया मध्ये अभिनया प्रमाणेच आणखीन पण एक टॅलेंट आहे.

akshya naik


एक लठ्ठ असलेली मुलगी जी मालिकेत स्वभावाने खूपच गोड दाखविण्यात आली आहे. सर्वांच्या घरात अशी प्रेमळ व्यक्ती असते, जिच्या मुळे घर भरभरून वाटते. लतिकाचे असेच एक पात्र मालिकेत पाहायला मिळत आहे. लतीकाच्या भूमिकेत दिसत असलेली अक्षया नाईक हीचा गाणे म्हणतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षया या व्हिडिओ मध्ये बॉम्बे चित्रपटातील “तू ही रे” गाणे गाताना दिसत आहे. ती प्रोफेशनल गायिका नसली तरी देखील तीचा हा गोड आवाज प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. हा व्हिडिओ समोर आल्याने अक्षयाचे लपलेले टॅलेंट समोर आले आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.