सध्या सर्वत्र नेपोटिस्म बद्दल सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे. अभिनय क्षेत्रातील मोठ्या कलाकारांची मुले अभिनयातच पुढे जाताना दिसतात. यामुळेच सर्वत्र राग व्यक्त केला जात आहे. परंतु मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलींनी मात्र दुसऱ्या विभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Alka Kubal daughters


आपल्या अभिनयाने 90 च्या दशक गाजविणाऱ्या अलका कुबल यांनी छायाचित्रकार समीर आठल्ये यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. अलका व समीर यांना 2 मुली असून दोघी अभिनयापासून दूरच राहिल्या आहेत. कस्तूरी आणि ईशानी असे दोघांची नावे आहेत. दोघीही सुशिक्षित असून मोठी मुलगी ईशानी ही वैमानिक(पायलट) आहे.

Alka Kubal daughters

खरे तर आई सारखे अभिनय कौशल्य ईशानी मध्ये देखील असतील पण तिने अभिनय क्षेत्र न निवडता पायलट होण्याचे स्वप्न पाहिले व तिने ते पूर्ण देखील केले. ईशानीचा या वर्षीच्या सुरुवातीला साखरपुडा झाला असून तिचा नवरा देखील पायलटच आहे. ईशानीचा होणाऱ्या नवऱ्याचे नाव निशांत वालिया असून ते दोघेही मियामी, फ्लोरिडा येथे राहतात.

Alka Kubal daughters


ईशानी ने वयाच्या 23 व्या वर्षीच पायलट बनून किर्तीमान मिळविला होता. अलका व समीर यांची दुसरी मुलगी कस्तूरी ही देखील उच्च शिक्षित आहे. दोन्ही मुली दिसायला खूपच सुंदर असून दिसण्यात अनेक अभिनेत्रींना मागे टाकतील. आज ईशानी हीचा वाढदिवस असून त्यानिमित्त अलका कुबल यांनी पोस्ट करून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

ईशानीला वाढदिवसाच्या व भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *