कोरोनाच्या काळात अनेक लोकांसमोर बेरोजगारीचे संकट उभे टाकले. त्यामुळे अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. तसेच, गरीब व मध्यमवर्गीय लोकांवर उपासमारीची वेळ देखील आली. अशीच काही परिस्तिथी दिल्लीमधील एका 80 वर्षीय जोडप्याची झाली होती.
दिल्ली मधील मालवीय नगर येथील या जोडप्याचे छोटासा स्टॉल होता. त्याचे नाव त्यांनी “बाबा का ढाबा” असे ठेवले होते. अगोदरच त्यांचे उत्पन्न जेमतेम होते, त्यातच लॉकडाऊन नंतर त्यांचा धंदा पूर्णतः चौपट झाला होता. स्वतःच्या मुलांनी देखील त्यांना मदत करण्यास नकार दिला होता. परंतु “गौरव वासन” नामक या युवकाने त्यांच्या परिस्तिथी बद्दल एक व्हिडिओ शूट केला व सोशल मीडियावर व्हायरल केला.
या एका व्हिडिओ मुळे त्या जोडप्याचे आयुष्यच बदलून गेले. दिल्ली मधील अनेकांनी त्यांचा ढाबा गाठत त्यांच्या भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच, अनेक दानशूर लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली. तसेच काहींनी धाब्यासाठी लागणारे अन्नधान्य देखील दिले. अनेक सेलिब्रिटींनी तिथे जाऊन जेवण करण्याचे आव्हान केले.
24 तासापूर्वी या जोडप्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि आता ते दोघांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आल्याचे दिसून येत आहे. लोक त्यांच्या हातचे जेवण खाण्यासाठी लाईन करून उभे राहिलेले दिसून येत आहे. यावरूनच एक व्हिडिओ एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतो, हे परत एकदा सिद्ध झाले आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा..