2020 या वर्षात कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, परंतु त्याच बरोबर कला क्षेत्रातील अनेकांना देखील जीव गमवावा लागला. त्यातच साउथचा अभिनेता चिरंजीवी सरजा 7 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते. या अभिनेत्याचे निधन ही कन्नड चित्रपटसृष्टी साठी दुःखद घटना होती.

चिरंजीवी सरजा या अभिनेत्याच्या निधनाचे तर दुःख फॅन्स ना होतेच, सोबतच त्याची पत्नी अभिनेत्री मेघना राज ही गरोदर असल्याने जास्त हळहळ व्यक्त करण्यात येत होते. चिरंजीवी ने मेघना हिच्यासोबत 2018 मध्ये विवाह केला होता. त्यापूर्वी दोघांची आठ वर्ष एकमेकांसोबत प्रेम देखील होते.
चिरंजीवीच्या मृत्यूने मेघना पूर्णपणे खचून गेली होती. चिरंजीवीच्या निधनावेळी मेघना 5 महिन्याची गरोदर होती. मेघनाने मागे पोस्ट करीत चिरंजीवीसाठी म्हटले देखील होते की मी तुझ्या बाळाची काळजी घेईन आणि त्याचे छान स्वागत देखील करेल.
चिरंजीवीचे स्वप्न पूर्ण करत मेघना ने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला व त्याचे काही फोटोज् सोशल मीडियावर टाकले होते. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात मेघनाने स्वर्गीय पती चिरंजीवीचे पोस्टर तिच्या बाजूला लावले होते. परंतू आता मेघनाने बाळाला जन्म दिला असून तिला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.
मेघनाला मुलगा झाल्याने तिच्या पोटी चिरंजीवी अाला असल्याच्या प्रतिक्रिया फॅन्स कडून व्यक्त केल्या जात आहेत. ही आनंदाची बातमी कुटुंबीयांनी सांगितली असून बाळाच्या फोटोज् व्हायरल होताना दिसून येत आहेत. माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.