लॉकडाऊन मध्ये सोशल मीडियावर अनेक प्रकारचे चॅलेंजेस पाहायला मिळाले. सामान्य जनतेसोबत अनेक सेलिब्रिटी देखील चॅलेंजेस पूर्ण करताना दिसून आले. आता मराठीतील काही सेलिब्रिटीनी एक नवीन चॅलेंज सुरू केले आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.“फुल टू वाजवा” हे नव्या चॅलेंजचे नाव असून हे एका नवीन गाण्याच्या चॅनेलच्या निमित्ताने सुरू करण्यात आले आहे. झी नेटवर्क ने “झी वाजवा” हे नवीन चॅनेल 17 ऑक्टोबर पासून सुरू केले असून त्यावर मराठी गीते दिसणार आहेत. त्यानिमित्ताने झी वाजवा ने दिलेले चॅलेंज हे मराठी सेलिब्रिटी पूर्ण करीत आहेत.झी वाजवाच्या इंस्टाग्राम हॅण्डल ने या चॅलेंज ची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या थीम वर डान्स स्टेप्स करून चॅलेंज स्वीकारायला सांगितलं. गायत्री दातार, तितिक्षा तावडे, अमेय वाघ यांनी हे चॅलेंज डान्स करून पूर्ण केले. गायत्रीने दातार ने चॅलेंज धनश्री काडगावकरला दिले.

धनश्री काडगावकर सध्या गरोदर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तीने हे चॅलेंज कसे स्विकारणार याकडे तिच्या फॅन्स चे लक्ष लागून होते. परंतु तिने हे चॅलेंज उत्तमरित्या पार पाडले. गरोदर असताना देखील ती नाचताना पाहून फॅन्स ने देखील वाहवाही केली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.