गेल्या 4 वर्षापासून तुझ्यात जीव रंगला ही मालिका झी मराठी या वाहिनीवर यशस्वीरित्या चालत आहे. राणा अंजलीच्या प्रेमापासून मालिकेला सुरुवात झालेल्या हा मालिकेत नंतर अनेक बदल झालेले पाहायला मिळाले. आता मालिकेतून बाहेर पडलेल्या धनश्री काडगावकर हीने फॅन्स साठी एक संदेश दिला आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिकेत जुन्या नंदीताची भूमिका साकारणाऱ्या धनश्री ने व्हिडिओ मध्ये म्हटले, “मालिकेत ट्विस्ट घेऊन येणारा बदल कालच्या भागात तुम्ही पाहिलेच असेल. गेले 3 वर्ष नंदिता हे पात्र मी साकारत होते. मला खूप मजा आली. मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, आशिर्वाद मिळाले.”
“माझ्या जीवनात आता त्यापेक्षाही महत्वाचा क्षण(इथे तिला गरोदरपणाबद्दल सांगायचं होते) अाला आहे. त्यामुळे मी हे पात्र नाही करू शकणार. माझ्या ऐवजी माधुरी पवार ही अभिनेत्री आता हे पात्र साकारणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जसे तुम्ही मला प्रेम, आशिर्वाद दिलात, तसेच प्रेम तिलाही द्या” असे पुढे धनश्री म्हणाली.
धनश्रीने जरी गरोदरपणामुळे मालिका सोडली असली तरी तीचे मालिकेवरील प्रेम कमी झाले नाही, असे तिच्या बोलण्यावरून दिसते. मालिकेत जरी तिने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला होता. नवीन नंदिता देखील प्रेक्षकांना तितकेच मनोरंजन करेल अशी अपेक्षा करू.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका