गेल्या काही महिन्यांपासून सेलिब्रिटीज लोकांच्या प्रेग्नंसी व नवीन बाळाच्या आगमनाच्या बातमी ऐकायला मिळत आहेत. अनुष्का शर्मा, करीना कपूर या अभिनेत्री प्रेग्नंट, तर हार्दिक पांड्या व नताशा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. आता एका मराठी अभिनेत्री ने देखील आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेयर केली आहे.

या मराठी अभिनेत्रीने मेहंदीचे फोटो शेयर करून फॅन्सना दिला सुखद धक्का. उद्या आहे लग्न
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नंदिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही गर्भवती असल्याचे समोर आले आहे. ही माहिती स्वतः धनश्रीने आपल्या फॅन्स ना दिली आहे. धनश्री व तिचे पती दुर्वेश देशमुख बाळाच्या आगमनाने हे खूपच आनंदी दिसून येत आहेत.

ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी तिने खास दिवस निवडला आहे. आज तीचे पती दूर्वेश देशमुखचा वाढदिवस आहे. यामुळेच धनश्री ने व्हिडिओ पोस्ट करीत कॅप्शन मध्ये असे लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा दुर्वेश. ही सुंदर बातमी सांगण्यासाठी हाच सुंदर दिवस आहे.” तसेच धनश्रीने हॅश टॅग मध्ये “कुणी तरी येणार ग” असे देखील टाकले आहे.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून निरोप घेतल्यानंतर धनश्रीने खूप कमी वेळ शूटिंगला दिला. तिने मागील काही महिन्यापासून कुटुंबाला जास्त वेळ दिला असल्याचे तिच्या प्रत्येक पोस्ट वरून दिसून आले. धनश्री व धूर्वेश या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. दोघांना येणाऱ्या बाळासाठी खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरु नका.