जर तुमच्या घरीही एलपीजी सिलेंडर येत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता गॅस सिलेंडरच्या घरपोच सेवा देण्यासंदर्भात गॅस कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गॅसची होत असलेली चोरी व योग्य ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी गॅस कंपन्यांनी 1 नोव्हेंबर पासून एक मोठा निर्णय घेतला आहे.

Gas cylinder new news


कंपन्यांनी या साठी एका नवीन सिस्टम ची अंमलबजावणी केली आहे. त्याचे नाव डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड(DAC) असे देण्यात आले आहे. या नवीन नियमानुसार आता ग्राहकांना ओटीपी शिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांना यापुढे त्या संदर्भात काळजी घ्यायला हवी.

Gas cylinder new news

गॅस सिलिंडर मागविताना यापुढे नोंदविण्यात आलेल्या मोबाईल नंबर वर एक कोड पाठविला जाईल. तो कोड ग्राहकांना जपून ठेवावा लागेल. ज्यावेळी गॅस डिलिव्हरी करताना आलेला व्यक्ती ग्राहकांना तो कोड विचारेल. मोबाईल मध्ये आलेला तो कोड त्या गॅस देणाऱ्यांना दाखवावा लागेल.

Gas cylinder new news


कोड दाखविल्याशिवाय ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही. 1 नोव्हेंबर पासून हा नियम लागू होणार असून तो निर्णय आत्ता फक्त 100 स्मार्ट सिटी मध्ये लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर तो संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे. गॅसची चोरी होत असलेल्या लोकांच्या तक्रारी लक्षात घेता गॅस कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.