अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या आपत्यानी स्वतःच्या टॅलेंट मधून पुढे नाव कमविले आहे. हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणेच मराठी मध्ये देखील अनेक कलाकार पाहायला मिळतील. मराठीतील जेष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

गिरीश ओक यांच्या मुलीचे नाव गिरीजा ओक आहे. गिरीजा मराठी प्रमाणेच हिंदी इंडस्ट्री मध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. वयाच्या 15 वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले व नंतर अनेक नावाजलेल्या चित्रपटात व मालिकांमध्ये भूमिका निभावली. गिरिजाची खरी ओळख अमीर खानचा गाजलेला चित्रपट “तारे जमीन पर” या चित्रपटामधून झाली.
तारे जमीन पर या चित्रपटात गिरिजाने जबीन नामक पात्र साकारले होते. शोर – इन द सिटी या हिंदी चित्रपटात देखील गिरीजाने सुंदर अभिनय केला होता. त्यानंतर ती गोष्ट छोटी डोंगराएवढी, गुलमोहर या लोकप्रिय मराठी चित्रपटात देखील दिसून आली. हुप्पा हुय्या या गाजलेल्या चित्रपटात गिरिजाने वासंती हे पात्र उत्तमरित्या साकारले होते.
लज्जा या मराठी मालिकेतून तसेच लेडीज स्पेशल या हिंदी मालिकेतून देखील गिरीजाला लोकप्रियता मिळाली. या व्यतिरिक्त गिरिजाने अनेक हिंदी व मराठी चित्रपटात छोटे मोठे पात्र साकारले आहे. सध्या सोनी मराठीच्या सिंगिग स्टार या शो मधून देखील ती दिसून येत आहे.

गिरीजा ने 11-11-2011 रोजी सुहरूद गोडबोले याच्याशी विवाह केला होता व ती अभिनेते श्रीरंग गोडबोले यांची सून आहे. गिरिजाचे वडील सध्या “अग्गबाई सासुबाई” या मराठी मालिकेत दिसून येत आहेत. परंतु गिरीजा ओक ही सुंदर व गुणवान अभिनेत्री गिरीश ओक यांची मुलगी आहे, हे खूपच कमी लोकांना माहिती असेल.
माहिती कशी वाटली ती कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..