उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाने अख्खा देश पेटून उठला आहे. पिडीत मुलीच्या मृत्यू कशामुळे झाला, मृत्यूस कोण कारणीभूत आहे, पीडितेचे अंत्यसंस्कार पोलिसांनी परिवाराला न विचारता केले? असे अनेक प्रश्नांमुळे वातावरण जास्तच संतापले आहे. आता या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हाथरस प्रकरणातील पिडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार व नंतर तिला गंभीर जखमी करण्यात आले होते. याबाबतीत तरुणीने एका व्हिडिओ द्वारे तीचे लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले होते. यासंबंधी अलिगड येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ने 22 सप्टेंबर रोजी दिलेल्या अहवालात पिडीतेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले होते.

आता परत जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ने शेवटच्या अहवालात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे सांगितले आहे. फॉरेन्सिक विश्लेषणाच्या अहवालानुसार पिडीतेवर कोणतेही लैंगिक अत्याचार झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत, यामुळेच हा अंतिम अहवाल बनविला असल्याचे समजते.

एकीकडे प्रथम अहवालात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता व दुसरीकडे अंतिम अहवाल समोर आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. तसेच, पिडीत तरुणीची जीभ कापण्यात आली असा दावा कुटुंबियांकडून करण्यात आली होती, परंतु पिडीत तरुणीच्या मृत्यूपर्वीच्या व्हिडिओ मुळे जीभ कापण्यात आली नसल्याचे अभिनेत्री पायल रोहतगी ने म्हटले होते.
यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..