बॉलिवुड मधील अनेक कलाकारांना कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल केले जाते. बॉलीवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री देखील याच त्रासातून पुढे आली व तिने करीयर मध्ये यश प्राप्त केले. आज त्या अभिनेत्रीने तिला स्वतःमध्ये काही गोष्टींची कमी वाटली परंतु तिने तरी देखील न थांबता पुढे गेल्याचे सांगितले आहे.
त्या अभिनेत्रीचे नाव आहे इलियाना डी’क्रूज. इलियानाने एका पोस्ट मध्ये असे लिहिले, “मी कशी दिसते या बाबतीत मला नेहमीच चिंता वाटायची. माझे हि.प्स खूप रुंद आहेत, याची मला नेहमीच चिंता वाटायची, माझ्या मांड्या ला भेगा पडलेल्या आहेत, माझे पोट तितके सपाट नाही, माझी छाती तितकी मोठी नाही, माझे हात खूपच मोठे आहेत.”
“नाक सरळ नाही आहे, ओठ पूर्ण भरीव नाहीत. मला काळजी आहे की मी जास्त उंच नाही, तितकी सुंदर नाही, पुरेशी विनोदी नाही, पुरेशी हुशार पण नाही, म्हणजे मी पूर्ण परिपक्व नाही.” असे इलियाना ने पुढे पोस्ट मध्ये लिहिले. असे म्हणत तिने पुढे जीवनात यावर कशी मात केली ते सांगितले.
“मी कधीच पूर्ण परिपक्व होण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व बाबतीत माझ्यात त्रुटी होत्या. भिन्न, विचित्र, अद्वितीय. प्रत्येक दोष मला फक्त, मला बनवते. त्यामुळेच मी थांबले. मी लोकांच्या आदेशांचे अनुपालन करण्याचा प्रयत्न करणे थांबविले. मी बसणे थांबविले. मी का बसावे? जेंव्हा मी उभे राहण्यासाठी जन्माला आले.” असे लिहीत इलियानाने युवा पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. तिच्या म्हणण्या नुसार लोकांच्या नजरेतून स्वतःला न पाहता पुढे जात रहा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..