आयपीएल 2020 हे रोमांचक होत असून ते आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. कारण, 46 सामने होवून देखील आजपर्यंत प्ले ऑफचे अंतिम 4 संघ निश्चित झाले नाहीत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स हे 3 संघ निश्चित वाटत असतानाच गेल्या काही सामन्यातील निकालामुळे आता त्यांच्यासाठीही धोक्याची घंटा आहे.

सध्या MI, RCB आणि DC हे तीन संघ अंक तालिकेत 14 अंकासहित प्रथम 3 स्थानावर आहेत. या तीन संघानी प्रत्येकी किमान 1 विजय मिळवला तरी त्यांचा प्ले ऑफ मधील प्रवेश जवळपास निश्चित होईल. परंतु, या तीन संगापैकी कोणत्याही एका संघाने एकही सामना जिंकला नाही तर मात्र त्या संघाला बाहेरचा रस्ता मिळू शकतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे MI, RCB आणि DC हे 3 संघ एकमेकांशी एक एक सामने खेळणार आहेत. या तीन संघात होणाऱ्या 3 सामन्यात प्रत्येक संघाचे 2 सामने असतील, जर एखाद्या टीम ने दोन्ही सामने हरले तर राहिलेल्या एका सामन्यात तर विजय मिळवावा लागणारच.

वरील टॉप 3 संघाचा उरलेला एक सामना हा एकाच संघाविरुद्ध म्हणजेच सनराइजर्स हैद्राबाद विरूद्ध असणार आहे. हे तिन्ही संघ फक्त प्ले ऑफ मध्ये प्रवेश करायला बघणार नाहीत तर, टॉप 2 मध्ये येण्यासाठी देखील लढताना दिसतील. तर दुसरीकडे KXIP, KKR आणि RR हे संघ देखील चौथा क्रमांक मिळविण्यासाठी लढताना दिसत आहेत.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.